
पंजाबच्या गुरुदासपूर येथील लष्करात सेवा बजावणाऱ्या जवानाच्या वृद्ध आई-वडिलांना मारहाण झाल्यानंतरही गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात आली. ज्यांना मारहाण करण्यात आली. त्यांची दोन्ही मुले लष्करात दाखल आहेत. एक पॅराशूट रेजिमेंटच्या स्पेशल फोर्सेज बटालियनमध्ये, तर दुसरा जम्मू-कश्मीरमध्ये तैनात आहे. मारहाणीविरोधात तक्रार दाखल करण्यास चार दिवस पोलिसांनी घेतले. मारहाणीत जखमी झालेल्या वृद्ध आई-वडिलांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुदासपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांना विनंती केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
























































