नदीच्या पुरात वाहून गेली वृद्ध व्यक्ती, यवतमाळमधला व्हिडीओ व्हायरल

यवतमाळ जिल्ह्यातील एका धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती पूर आलेल्या नदीजवळ तोल जाऊन पडतो आणि जोरदार प्रवाहात वाहून जातो, असे दिसतं. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

या व्हिडीओमध्ये वृद्ध व्यक्ती कुठल्याही आधाराशिवाय सरळ उभा असल्याचे दिसते. तो आधारासाठी काठी पकडण्याचा प्रयत्न करत असताना एक तरुण त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, काठी हातातून सुटताच आणि तरुणाने त्याचा टी-शर्ट पकडण्याचा प्रयत्न करताच वृद्ध व्यक्तीचा तोल गेला आणि जोरदार प्रवाहाने त्याला वाहून नेले.

व्हिडिओच्या शेवटच्या क्षणांत तो माणूस प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा प्रयत्न करतो, झगडतो, तर दुसरीकडे प्रेक्षक “गेला, गेला” अशी आरोळी देत उभे राहतात; पण मदत करण्याचा प्रयत्न करत नाहीत. दरम्यान, वृद्ध माणूस झगडत असतानाही तरुण मागे हटतो आणि वृद्धाला पाण्यात वाहून जाताना बघतच लोक तिथे उभे राहतात.