निवडणूक आयोग भाजप कार्यालयातून काम करतो, आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पश्चिम बंगालमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला. निवडणूक आयोग हा भाजप कार्यालयातूनच काम करतो, अशी टीका त्यांनी केली.

आदित्य ठाकरे आज चेंबूर महोत्सवात सहभागी झाले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पश्चिम बंगालमधील परिस्थितीवर टीका केली. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट सुरू आहे की काय? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. असेच चालू राहिले तर हिंदुस्थानचा उत्तर कोरिया बनेल, अशी भीती आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. बंगालमधील निवडणुकीसाठी भाजपने तिथे पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी केल्या आहेत, एकदा निवडणूक होऊ द्या मग किती वाढवतील त्याचा पत्ताही लागणार नाही, असेही ते पुढे म्हणाले.