Bihar Election 2025 -पैसे, मोफत वस्तू, अमली पदार्थ आणि दारु वापराबाबत सतर्क राहा; निवडणूक आयोगाच्या कडक सूचना

बिहार विधानसभा निवडणुका आणि आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांबाबत अंमलबजावणी संस्थांना कडक सूचना जारी केल्या आहेत. निवडणुकीत पैसेवाटप मोफत वस्तूंचे वाटप, अमली पदार्थ आणि दारु याचा गैरवापर रोखणे हे आयोगाचे वैशिष्ट्य आहे.

बिहार विधानसभेच्या निवडणुका 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी होणार असून त्याचे निकाल 14 नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. निवडणूक आयोगाने पैसे, दारू, अमली पदार्थ आणि मोफत वस्तूंचा गैरवापर रोखण्यासाठी अंमलबजावणी संस्थांना कडक सूचना दिल्या आहेत. निवडणूक आयोगाने सांगितले की, राज्य पोलीस विभाग, आयकर विभाग, राज्य मद्य विभाग, आरबीआय, सीजीएसटी, एसजीएसटी, डीआरआय, ईडी, एनसीबी, आरपीएफ, सीआयएसएफ, एसएसबी, बीसीएएस, एएआय, टपाल विभाग, राज्य वन विभाग आणि राज्य सहकार विभाग यासह सर्व संबंधित एजन्सींना निवडणूक नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

निवडणूक खर्च निरीक्षकांचे उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नजर असणार आहे. ते सर्व खर्च देखरेख पथकांना भेटण्यासाठी आणि नियमित खर्च अहवाल सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या संबंधित मतदारसंघांना भेट देतील. आयोगाने फ्लाइंग स्क्वॉड्स, पाळत ठेवणारी पथके आणि व्हिडिओ पाळत ठेवणारे पथके यांना चोवीस तास सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.