वीज बिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे सूचना

433

लॉकडाऊन काळात आलेल्या वाढीव वीज बिलामुळे अनेक ग्राहकांना धक्का बसला आहे. ग्राहकांकडून बिलाबाबत होणाऱ्या तक्रारींची दखल घेत साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी एक बैठक बोलावली होती. या बैठकीला महावितरणचे अधिकारीही हजर होते. या बैठकीमध्ये पाटील यांनी वीज बिलांसंदर्भात आलेल्या तक्रारींचे त्वरीत निराकरण करा अशा सूचना केल्या.

कोरोना महामारीमुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. अनेकांच्या हातचे रोजगार गेले आहेत. त्यातच वीजग्राहकांना भरमसाठ बिल मिळाल्याने ते हैराण झाले आहेत. यातील काहींचा कोरोना काळात रोजगार गेला असल्याने साधं बिल भरता येणं मुश्कील झालेलं असताना हे वाढीव बिल कसं भरायचं हा प्रश्न आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील विद्युत ग्राहकांमध्येही कमालीची अस्वस्थता आहे. नागरिकांनी आपल्याला बिल दुरूस्त करून घेण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याच्या बऱ्याच तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींचीही पाटील यांनी दखल घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांना ग्राहकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घ्यावी अशी सूचना केली. ज्या ग्राहकांच्या वीज बिलांमध्ये खरोखरच चूक आहे त्यांच्या तक्रारीचे त्वरीत निवारण करावे असेही त्यांनी सांगितले.

.

आपली प्रतिक्रिया द्या