कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे वीज उपकरणांचे नुकसान

24

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण सोमवार पेठ भंडारी हायस्कूल मार्गावर बसविण्यात आलेल्या वीज वितरणच्या ट्रान्स फार्मर मधून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने परिसरातील व्यापारी वर्गाच्या विविध उपकरणाची नुकसानी झाली आहे. त्यामुळे याठिकाणी नवीन २००- २५० केव्ही चा ट्रान्स फार्मर बसविण्यात यावा अशी मागणी व्यापारी वर्गाच्या वतीने शनिवारी मालवण वीज वितरणचे सहाय्यक अभियंता भुजबळ यांच्याकडे करण्यात आली आहे.

यावेळी येत्या आठ दिवसात याठिकाणी नवीन ट्रान्स फार्मर बसवून व्यापारी वर्गाच्या समस्या सोडविण्यात येतील असे आश्वासन व्यापारी वर्गाला देण्यात आले. मालवण सोमवारपेठ भंडारी हायस्कूल येथील व्यापारी बांधवांनी कमी दाबाच्या वीज समस्या, व उपकरणाच्या होत असलेल्या नुकसानी बाबत वीज वितरण चे लक्ष वेधले. यावेळी व्यापारी योगेश कांबळी, संतोष खराडे, अण्णा कारेकर, हिमांशू भगत, छोटू तारी, प्रसाद धारगळकर, केदार सावंत, सोनू राणे, विनायक चव्हाण, सुर्यकांत चव्हाण आदि व्यापारी उपस्थित होते.

यावेळी व्यापारी बांधवांनी सोमवार पेठ भंडारी हायस्कूल मार्गावर काही दिवसापूर्वी जुना ट्रान्सफार्मर बसविण्यात आला असून या ट्रान्स फार्मर मधून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने येथील व्यापारी वर्गाच्या फ्रीज तसेच अन्य उपकरणाची नादुरुस्ती झाली आहे. तर काहीवेळा उपकरणे चालत नाहीत. त्याचा व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यामुळे याठिकाणी बसविण्यात आलेला जुना ट्रान्स फार्मर बदलून नवीन २००-२५० के व्ही चा ट्रान्स फार्मर बसविण्यात यावा अशी मागणी व्यापारी वर्गाने केली.

यावेळी वीज वितरणचे सहाय्यक अभियंता भुजबळ यांनी आठ दिवसात नवीन ट्रान्स फार्मर बसवून परिसरातील समस्य सोडविण्यात येतील असे आश्वासन व्यापारी वर्गाला दिले.

आपली प्रतिक्रिया द्या