
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि अब्जाधीश सल्लागार एलॉन मस्क यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मस्क यांनी ट्रम्प यांची साथ सोडली असून याबाबत एक्सवर (आधीचे ट्विटर) एक पोस्ट करून त्यांनी माहिती दिली आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत बहुमताने विजयी झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्जाधीश उद्योजक एलॉन मस्क यांची अमेरिकन सरकार कार्यक्षमता विभागाच्या पदी नियुक्ती केली होती. ट्रम्प यांचे विशेष सल्लागार म्हणून ते काम पाहत होते. मात्र आता त्यांनी हे पद सोडण्याची घोषणा केली आहे.
अमेरिकन सरकारमधील विशेष कर्मचारी म्हणून माझा कार्यकाळ संपत आलेला आहे. सरकारचा अनावश्यक खर्च कमी करण्याची मला संधी दिल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मी मनापासून आभार मानतो, असे मस्क यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. तसेच डीओजीईचे ध्येच काळानुसार अधिक मजबूत होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
As my scheduled time as a Special Government Employee comes to an end, I would like to thank President @realDonaldTrump for the opportunity to reduce wasteful spending.
The @DOGE mission will only strengthen over time as it becomes a way of life throughout the government.
— Elon Musk (@elonmusk) May 29, 2025
दरम्यान, डीओजीईचे कामकाज पाहत असताना एलॉन मस्क यांना आपल्या टेस्ला कंपनी आणि इतर उद्योगांवर लक्ष केंद्रीत करता येत नव्हते. तसेच ट्रम्प प्रशासनाने आणलेल्या ‘वन, बिग, ब्यूटीफूल बिल’मुळेही ते नाराज होते. मस्क यांनी जाहिररित्या या बिलवर टीका केली होती. त्यामुळे मस्क आणि ट्रम्प यांच्या कटुता निर्माण झाल्याची चर्चा होती. अशातच मस्क यांनी अचानक सल्लागाराचे पद सोडण्याचा निर्णय घेतल्याने दोघांमधील कटुतेच्या चर्चांना बळ मिळत आहे.
हे वाचा – दररोज 3000 लोकांना अटक करा, ट्रम्प प्रशासनाचे अधिकाऱ्यांना आदेश; काय आहे कारण?
‘वन, बिग, ब्यूटीफूल बिल’ काय आहे?
अमेरिकेतून जगभरातल्या विविध देशांमध्ये पाठवण्यात येणाऱ्या पैशांवर म्हणजे इंटरनॅशनल मनी ट्रान्सफरवर 5 टक्के कर लावण्याचा प्रस्ताव ‘वन, बिग, ब्यूटीफूल बिल’मध्ये आहे. यामध्ये एच-1बी, एच-2बी, एल 1, एफ 1 सारखे नॉन-इमिग्रंट व्हिसाधारक आणि ग्रीनकार्ड होल्डर्सचाही समावेश असेल. याचाच अर्थ म्हणजे अमेरिकेत राहणाऱ्या व्यक्तीला हिंदुस्थानात 10 हजार डॉलर्स पाठवायचे असतील तर अधिकचे 500 डॉलर्स खिशातून खर्च करावे लागतील. या बिलवर मस्क यांनी नाराजी व्यक्त केली होती.
काय ‘मस्क’री चाललीय!स्पेसएक्सच्या स्टारशिपचे रॉकेट नवव्यांदा कोसळले