एल्फिन्स्टन पूलबाधितांचा अ‍ॅण्टॉप हिल, भायखळ्यातील घरे स्वीकारण्यास विरोध; दादर, प्रभादेवीमध्येच घरे द्या, हाजी नुरानी इमारतीतील रहिवाशांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एल्फिन्स्टन पुलामुळे बाधित होणाऱया हाजी नुरानी या इमारतीमधील अकरा रहिवाशांनी एमएमआरडीएकडून देण्यात येणाऱया भायखळा आणि अॅण्टॉप हिल येथील घरे स्वीकारण्यास विरोध दर्शवला आहे. आम्हाला दादर आणि प्रभादेवी परिसरातच घरे द्या, अशी आग्रही मागणी या रहिवाशांनी एमएमआरडीएकडे केली आहे.

एल्फिन्स्टन पुलाच्या कामामुळे येथील हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवास या इमारती बाधित होणार आहेत. हाजी नुरानीमधील 23 पैकी 11 रहिवाशांना दादर पूर्व दादासाहेब फाळके रोडवरील पवन सोसायटी, अ‍ॅण्टॉप हिल येथील रामबाग सोसायटी आणि जेकब सर्कल, भायखळा येथे घरे दिली जाणार आहेत. ही घरे प्राईम लोकेशनवर नाहीत तसेच या परिसरात गर्दुल्यांचा वावर असतो. त्यामुळे आम्ही ही घरे नाकारली असून दादर, प्रभादेवीतच घर देण्याची मागणी एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवाजी दावभट यांच्याकडे केल्याचे हाजी नुरानीचे सचिव मुनाफ ठाकूर यांनी सांगितले.

अतिरिक्त क्षेत्रफळाचे पैसे आकारू नका

एल्फिन्स्टन पूलबाधितांना 405 चौरस फुटांपर्यंतचे घर मोफत देण्यात येणार आहे. मात्र काही रहिवाशांना एमएमआरडीएने अतिरिक्त क्षेत्रफळासाठी पैसे भरण्यास सांगितले आहेत. आमची घरे प्राईम लोकेशनवर असून तिथे समूह पुनर्विकास झाला असता तर आम्हाला 550 चौरस फुटांची घरे मिळाली असती. त्यामुळे अतिरिक्त क्षेत्रफळाचे पैसे आमच्याकडून आकारू नये अशी मागणी आम्ही गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे मुनाफ ठाकूर यांनी सांगितले.

मोदी मलेशियात

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी दोन दिवसांच्या मलेशिया दौऱयावर रवाना झाले. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी क्लालालंपूर विमानतळावर त्यांचे स्वागत केले. यावेळी मोदींनी इब्राहिम यांच्याशी हस्तांदोलन करत त्यांची गळाभेटही घेतली.