परशुराम घाटातील भराव वाहून गेला, रस्ता धोकादायक झाल्याने एकेरी वाहतूक

मुंबई – गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंत वाहून गेली आहे. भिंतीचा भराव वाहून गेल्यामुळे मुख्य रस्ता धोकादायक बनला आहे. दरम्यान परशुराम घाटातून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली असून एक बाजू वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली आहे. घाटातील भराव वाहून गेल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

परशुराम घाटात खोदकाम करताना रस्ता वाहून जाऊ नये याकरीता संरक्षक भिंत बांधली होती. काल चिपळूण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यानंतर आज परशुराम घाटातील संरक्षक भिंतीचा भराव वाहून गेल्याची घटना घडली आहे. भराव वाहून गेल्यामुळे रस्ता धोकादायक बनला आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरु आहे.