शत्रूंची आता खैर नाही; लष्कराच्या ताफ्यात स्वदेशी नागास्त्र

हिंदुस्थानी लष्कराने 480 सुसाईड ड्रोन खरेदी केले होते. आता ते अधिकृतपणे लष्कराच्या ताफ्यात दाखल झाले आहेत. हे ड्रोन नागास्त्र म्हणूनही ओळखले जातात. हे शत्रूंचे बंकर, पोस्ट आणि शस्त्रास्त्रs डेपोला उद्धवस्थ करण्याचे काम करतात. लष्कराच्या ताफ्यात नागास्त्र-1 दाखल झाल्याने लष्कराची पॉवर आता कैक पटीने वाढली आहे. हे लष्करासाठी ब्रम्हास्त्रपेक्षा कमी नाही.

गेल्या वर्षी लष्कराकडून याची चाचणी घेण्यात आली होती. चीनकडील सीमा लडाख जवळ याची चाचणी घेण्यात आली होती. सुसाईड ड्रोन आल्याने भविष्यात सर्जिकल स्ट्राईकसाठी फायटर जेटच्या जागी याचा वापर केला जाऊ शकतो. हे ड्रोन खूपच सक्षम असून ते शत्रूंच्या घरात घुसून हल्ला करण्यात सक्षम आहेत. हे ड्रोन दोन प्रकारचे असून दोन्ही 60 ते 90 मिनिटांपर्यंत उड्डाण करू शकतात. नागपूरच्या एका कंपनीने स्वदेशी नागास्त्र-1 लष्कराकडे सोपवले. नागपूरच्या सोलर इंडस्ट्रीजने या ड्रोनला तयार केले आहे.