अ‍ॅशेसमध्ये इंग्लंडला आणखी धक्का; गस अ‍ॅटकिन्सनही बाहेर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंडच्या अडचणी संपताना दिसत नाहीत. मेलबर्न कसोटीत विजय मिळवून सावरलेला इंग्लंडचा संघ आता मोठय़ा संकटात सापडला आहे. वेगवान गोलंदाज गस अ‍ॅटकिन्सन डाव्या पायाच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे तो सिडनीतील पाचव्या व निर्णायक कसोटीत खेळू शकणार नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पॅनमध्ये दुखापत निश्चित झाल्याची माहिती दिली. याआधीच मार्क वुड आणि जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे बाहेर असल्याने इंग्लंडचा वेगवान मारा कमकुवत झाला होता. त्यात आणखी भर पडलीय. आत सिडनी कसोटीसाठी अॅटकिन्सनच्या जागी मॅथ्यू पॉट्स, मॅथ्यू फिशर किंवा फिरकीपटू शोएब बशीर यापैकी एखाद्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.