2018 मध्ये प्रदर्शित झालेला ‘तुंबाड’ पुन्हा 30 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2018 साली आलेला ‘तुंबाड’ या पीरियड हॉरर चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप पाडली होती. हाच चित्रपट पुन्हा एकदा 30 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात रि-रिलीज होत आहे. निर्माता सोहम शहा याने फोटो शेअर करून दुसरा भागही येऊ शकतो, असे संकेत दिले.
View this post on Instagram
‘चिलिंग विथ हस्तर’ या कॅप्शनसह एक पोस्ट सोहमने शेअर केली आहे. शुटिंग दरम्यान सोहमने ही पोस्ट शेअर केल्याने या सोशल मीडिया पोस्टवरून ‘तुंबाड 2’ चे संकेत देत असल्याची चर्चा रंगली आहे. या फोटोमध्ये विनायक जमिनीवर झोपलेला असून हस्तर राक्षस त्याला मागून पाहत असल्याचे दिसून येत आहे.
तुंबाडची सोशल मीडिया पोस्ट पाहून रहस्य अनुभव घेण्यास प्रेक्षक सज्ज झाले आहेत. दरम्यान कलाकारही ‘तुंबाड 2’ साठी उत्सुक आहेत. तरी अद्याप ‘तुंबाड 2’ बद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ‘तुंबाड 2’ कधी येणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आणखी वाट पहावी लागणार आहे.