पोर्तुगालची विजयी सलामी, युरो फुटबॉल: झेक प्रजासत्ताकवर 2-1ने मात

स्टॉपेज टाईममध्ये बदली खेळाडू फ्रोन्सिको कोंसिकाओ निर्णायक गोलच्या जोरावर पोर्तुगालने झेक प्रजासत्ताकचा 2-1 गोलफरकाने पराभव करीत युरो चषक फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. मैदानावर 90व्या मिनिटाला उतरलेल्या कोंसिकाओने 92 व्या मिनिटाला पेट्रो नेटोच्या पासवर हा विजयी गोल केला.

लुकास प्रोवोडने 62 व्या मिनिटाला गोल करीत झेक प्रजासत्ताकचे खाते उघडले. मग पिछाडीवर पडलेल्या पोर्तुगालने झेक प्रजासत्ताकवर प्रतिआक्रमण रचले. शेवटी आठ मिनिटांनी म्हणजे 69 व्या मिनिटाला रॉबिन हॅरानॅकने गोल करीत पोर्तुगालला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. खेळ अतिरिक्त वेळेत जाणार असे वाटत असतानाच बदली खेळाडू फ्रोन्सिको कोंसिकाओने कमाल करीत पोर्तुगालच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. याआधी 24 वर्षांपूर्वी फ्रोन्सिको कोंसिकाओचे वडील सर्जियो यांनी गतविजेत्या जर्मनीला 2000 च्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखविला होता.