सोशल मीडियावर सध्या एका माजी एअर होस्टेसची मुलाखत चांगलीच गाजत आहे. डेली स्टारला दिलेल्या मुलाखतीत स्काय नावाच्या 48 वर्षीय एअर होस्टेसने आपला 17 वर्षांचा अनुभव शेअर केला आहे. स्काय सध्या रेडिओ प्रेजेंटर म्हणून काम करते. एअरलाइन क्रू मेंबर्स आणि पायलट यांच्यातील संबंधांबद्दल स्कायने खुलासा केला आहे. पायलटसोबत अफेअर्स आणि रूम पार्टीजच्या गोष्टीही तिने शेअर केल्या.
स्काय म्हणाली की, विशेषत: जोहान्सबर्गमध्ये फ्लाइट जेव्हा लँड करायची तेव्हा क्रू मेंबर्स आणि पायलट यांच्यातील संबंधांच्या सीमा ओलांडल्या जात. मला वाटते की हा सर्व वाइन आणि ऑक्सिजनच्या कमतरतेचा परिणाम होता, कारण जोहान्सबर्गमध्ये नेहमीच काही ना काही घडत असे, असेही स्काय पुढे गमतीने म्हणाली.
वेगवेगळ्या एअरलाइन्सचे कर्मचारी एकाच हॉटेलमध्ये राहायचे, त्यामुळे सगळे एकत्र रूम पार्ट्यां एन्जॉय करायचे. या पार्ट्यांमध्ये कधी-कधी ‘जोखमीच्या’ गोष्टीही वापरल्या जात असल्याचं स्कायने मान्य केलं.
जेव्हा ‘ऑर्गी’ चा सामना करावा लागतो
जेव्हा तिला विचारले की तिला खरच ऑर्गीचा सामना करावा लागला का? तेव्हा तिने हसली आणि म्हणाली, होय हे असेच काहीतरी होते. ऑर्गी म्हणजे असे वातावरण जेथे लोक कोणत्याही बंधनाशिवाय शारीरिक संबंध ठेवू शकतात.
कामाच्या वेळी आपण नेहमीच व्यावसायिक वृत्ती ठेवली, परंतु तिच्या सहकाऱ्यांसाठी नेहमीच असे नसते. अनेक वेळा पायलटशी संबंध प्रस्थापित केल्यानंतर क्रू मेंबर्सची वागणूक पूर्णपणे बदलते, असेही स्कायने स्पष्ट केले.
मात्र, आपण स्वत:ला या सगळ्यापासून दूर ठेवले. पायलटशी आपले कधीच अफेअर नव्हते किंवा संबंधही नव्हते. मला ते नेहमीच व्यावसायिक आणि सज्जन वाटले. पण जसे प्रत्येक क्षेत्रात घडते, तसेच येथेही काही लोक मर्यादा ओलांडतात.