माजी आमदार सुभाष साबणे यांनी भारतीय जनता पक्षाला सोड चिठ्ठी दिली आहे. दोन वर्षापूर्वी त्यांनी शिवसेनेतून भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला होता. त्यानंतर साबणे यांनी बिलोली-देगलूर विधानसभेची पोटनिवडणूक भाजपाच्या चिन्हावर लढवली होती.
बिलोली-देगलूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढविलेल्या माजी आमदार सुभाष साबणे यांनी दोन वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शिवसेनेशी गद्दारी करुन त्यांनी देगलूर विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या विरोधात जितेश अंतापूरकर हे उमेदवार होते. जितेश अंतापूरकर त्यावेळी विजयी झाले. या निवडणुकीत पक्षाशी गद्दारी करणार्या सुभाष साबणे यांना शिवसैनिकांनी धडा शिकवून त्यांना पराभूत केले.
2024 च्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी साबणे यांनी भाजपाकडून तिकीट मागितले होते. मात्र जितेश अंतापूरकर यांच्या काँग्रेसमधून भाजपमध्ये झालेल्या प्रवेशामुळे ते अस्वस्थ होते. आज त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य, लाडकी बहिण योजना समिती अध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती सदस्य या तिन्ही पदांचा राजीनामा दिला आहे. कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करुन बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पार्टी या पक्षात ते प्रवेश करणार असल्याचे वृत्त असून, त्यास त्यांनी दुजोरा दिला आहे. तिसर्या आघाडी मार्फत ते निवडणूक लढविणार असल्याचे समजते