
पेरू या देशातील एका कोर्टाने माजी राष्ट्रपती मार्टिन विजयकार्रा यांना 14 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. मार्टिन यांनी दक्षिणेतील मोकेगुआ राज्याचे गव्हर्नर म्हणून काम करताना एका हॉस्पिटलच्या निर्माणासाठी अधिकाऱयांकडून 6,11,000 डॉलरची लाच स्वीकारल्याच्या त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. हॉस्पिटल बांधण्याचा ठेका देण्याच्या बदल्यात ही लाच स्वीकारली होती. याचा गौप्यस्फोट करण्यात आल्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचले. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मार्टिन यांना दोषी ठरवले. त्यानंतर 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.



























































