रिझर्व्ह आणि स्टेट बँक भरती पूर्व प्राथमिक परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करा!

465
shivsena-logo-new

रिझर्व्ह बँकेत असिस्टंट पदासाठी तर स्टेट बँकेत कारकून पदासाठी भरती होणार आहे. या दोन्ही बँकांची पूर्व प्राथमिक परीक्षा एकाचवेळी म्हणजेच 14 आणि 15 फेब्रुवारीला होणार आहे. जे उमेदवार दोन्ही परिक्षांना बसणार आहेत कदाचित त्यांना एका परिक्षेला मुकावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पूर्व प्राथमिक लेखी परिक्षेच्या वेळापत्रकात बदल करावा किंवा दोन्ही बँकेत अर्ज केलेल्या उमेदवारांना परिक्षेला बसण्यास संधी मिळावी यासाठी दोन्ही दिवशी दोन ते तीन सत्रात परिक्षेचे वेळापत्रक निश्चित करावे अशी मागणी स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाने आयबीपीएसकडे केली आहे.  रिझर्व्ह बँकेत असिस्टंट या पदासाठी 926 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. तर स्टेट बँक ऑफ इंडियात कारकून पदासाठी 8 हजार जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.

25 जानेवारीला प्रशिक्षणवर्ग

आरबीआय आणि एसबीआय बँकेत भरतीसाठी होणाऱ्या परिक्षेच्या पूर्वतयारीसाठी स्पर्धात्मक लेखी परिक्षेत जास्तीत जास्त उमेदवार यशस्वी व्हावेत यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, लोकाधिकार समितीचे अध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार गजानन कीर्तीकर, सरचिटणीस-खासदार अनिल देसाई आणि कार्याध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, 25 जानेवारीला शिवसेना भवन येथे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे. नावनोंदणीसाठी संपर्क- शरद एक्के – 9892699215, श्रीराम विश्वासराव – 9869588469 किंवा विलास जाधव 9619118999

आपली प्रतिक्रिया द्या