पंचतत्त्व, या संकल्पनेचे अनेक कलाकारांना आकर्षण असते. अनेक कलाकार आपापल्या कलाकृतींतून पंचतत्त्वापर्यंत पोहोचण्याचा किंवा आपल्या कलेच्या माध्यमातून पंचतत्त्वाशी तादात्म्य पावण्याचा प्रयत्न कधीतरी करत असतात. अशीच एक पर्वणी चित्रप्रेमींना आंतरराष्ट्रीय चित्रकार, लेखिका दीपा कुलकर्णी यांच्या चित्रांच्या रुपाने अनुभवण्यास मिळाली. मुंबईतील ताज महल आर्ट गॅलरीमध्ये दीपा कुलकर्णी यांना काढलेल्या आणि पंचतत्त्व या संकल्पनेवर आधारित नयनरम्य चित्रांची अनुभूती रसिक प्रेक्षकांना आली.
स्पंदन आर्टबीट ग्लोबल वुमन अँड क्रिएटिव्हीटीच्या सहकार्याने 27 ते 30 ऑगस्ट या कालावधीमध्ये पार पडलेल्या या चित्रप्रदर्शनाला शोएब चौधरी, तुतुल भट्टाचार्य, अशोक खोब्रागडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आवर्जून उपस्थित लावली होती. दीपा कुलकर्णी यांनी यापूर्वी मुंबईतील कमल नयन बजार आर्ट गॅलरी, जयपूरमधील जवाहर कला केंद्र आणि न्यूयॉर्कमधील आर एक्स्पो सारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर आपल्या कलाकृती सादर केल्या आहेत.