
राजस्थानातील भिवाडी जिह्यात एका रसायनाच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात 8 कामगार जिवंत जळाले असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. या कारखान्यात अवैधरित्या फटाके बनवण्यात येत होते. घटनास्थळावरून फटाक्यांसाठी लागणारा दारुगोळा, तयार फटाके तसेच पॅकिंगचे साहित्य आढळले आहे.
भिवाडी जिह्यातील खुशखेडा कारौली येथील औद्योगिक परिसरात आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. स्पह्ट झाला त्या वेळी 25 मजूर काम करत होते. स्पह्ट एवढा भीषण होता, की जवळपास असलेल्या 8 मजुरांच्या मृतदेहांच्या अक्षरशः चिंधडय़ा झाल्या. काही मृतदेहांचा कोळसा झाला. स्पह्टामुळे जवळपासच्या परिसरात भूपंप आल्याप्रमाणे हादरे जाणवले. 8 मृतांपैकी तिघांची ओळख पटली असून मिंटू, नितेश आणि सुजान अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व मजूर बिहारमधील मोतिहारी जिह्यातील मूळ रहिवाशी होते. याशिवाय अनूप कुमार, जुन्नू, विवेक कुमार आणि मन्नू यांना नवी दिल्लीतील एम्स येथे हलवण्यात आले आहे.
व्यवस्थापकाला अटक, मालक फरार
जिल्हा प्रशासनने या घटनेनंतर जिह्यातील सर्व कारखान्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. स्पह्ट झाला त्या कारखान्याच्या मालकाचे नाव राजेंद्र असे असून त्याने दुसऱया व्यक्तीला कारखाना भाडय़ाने दिला होता. कारखान्याचा व्यवस्थापक अभिनंदन याला अटक करण्यात आली आहे.



























































