फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणखी मालामाल झाले असून जगातील दुसरे सर्वात धनाढ्य व्यक्ती बनले आहेत. त्यांनी जेफ बेझोसला मागे टाकले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. या वर्षी, कंपनीच्या स्टॉकच्या मजबूत कामगिरीमुळे, त्यांची संपत्ती 78 अब्ज डॉलरनी वाढली आहे. आता त्यांच्याकडे 200 अब्ज डॉलरपेक्षाही अधिक संपत्ती आहे. त्यांची एकूण संपत्ती 206.2 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. श्रीमंतांच्या यादीत 4 क्रमांकानी वर सरकून त्यांनी जेफ बेझोस यांना मागे टाकून हे स्थान मिळवले आहे. आता फक्त टेस्लाचे मालक एलॉन मस्क या क्रमवारीत या दोघांच्या पुढे आहेत. एलोन मस्कची एकूण संपत्ती सध्या 256 अब्ज डॉलर आहे. मार्क झुकेरबर्ग 206 अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या स्थानावर आणि अमेझॉनचे माजी सीईओ जेफ बेझोस 205 अब्ज डॉलर्ससह तिसऱ्या स्थानावर आहेत. आता मार्क झुकरबर्ग यांना एलॉन मस्क यांना मागे टाकण्यासाङ्गी आणखी फक्त 50 अब्ज डॉलर कमवायचे आहेत. मेटा प्लॅटफॉर्मचे समभाग मूल्य जवळपास 70 टक्क्यांनी वाढले आहे.