महापालिकेच्या रेंटल हौसिंग इमारतीमध्ये बेकायदेशीर बनावट विदेशी व देशी मद्याचा कारखाना सुरू असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मुंबई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मुंबई राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई याबाबतची माहिती मिळताच त्यांनी मुंबई-अहमदाबाद मार्गावरील लोढा एमएमआरडीएच्या इमारतीतील तळ मजल्यावर असलेला हा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारखान्यातून पोलिसांनी मद्य बनवण्याचे साहित्य, रिकाम्या बॉटल्या आणि मशीन जप्त केल्या आहेत.
विधानसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत एक व्यक्ती विदेशी मद्य विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी माहीम-सायन लिंक रोडवर सापळा रचून मोहम्मद नौशाद नसरूद्दीन आलम व नवीनकुमार नूर यांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांना बनावट विदेशी मद्याच्या १००० मि. लि. च्या पाच बाटल्या मिळून आल्या. याप्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी केली असता मीरा रोड पूर्वेतील कूर मॉलसमोर असलेल्या लोढा एमएमआरडीए इमारतीमधील गाळा नं. ठाकूर 11 मध्ये हा गोरखधंदा सुरू असल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी छापेमारी करत कारखान्यातून विदेशी मद्याच्या दोन बाटल्या, बनावटी विदेशी मद्याच्या तीन बाटल्या, रिकाम्या बाटल्या, बुच (झाकण), लेबल, मद्याच्या बाटल्या तयार करण्यासाठी आवश्यक सामग्री व इतर साहित्य असा मुद्देमाल 63 हजार 185 रुपये किमतीचा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
भाड्याच्या गाळे, खोल्यांमध्ये अवैध धंद्यांना ऊत लोढा एमएमआरडीएची ही इमारत महापालिकेकडे देखभाल दुरुस्तीसाठी हस्तांतरित करण्यात आलेली आहे. मात्र इमारतीतील लाभार्थी हे खोल्या किंवा गाळे परस्पर भाड्याने देत असल्याने अवैध धंद्यांना ऊत आला आहे. काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे महापालिकेच्या इमारतीमध्ये कारवाई करून पोलिसांनी देहव्यापाराचा धंदा उद्ध्वस्त केला होता त्यावेळी पोलिसांनी पिटांतर्गत गुन्हा दाखल केला होता. जवळपास ९० टक्के लाभार्थ्यांनी मिळालेल्या महापालिकेच्या इमारतीतील खोल्या किंवा गाळे भाड्याने दिल्याचे समोर आले आहे.