सुहाना खान जमीन खरेदी प्रकरणात ‘खोटे’ व्यवहार; अलिबाग तहसीलदारांचा अहवाल

अभिनेत्री सुहाना खान जमीन खरेदी-विक्री प्रकरणात खोटे कुटुंबाने ‘खोटे’ व्यवहार केले असल्याचा धक्कादायक प्रकार अलिबाग तहसीलदारांच्या अहवालातून उघडकीस आला आहे. तालुक्यातील थळ येथील सर्व्हे नंबर ३४५/२ ही जमीन खोटे कुटुंबीयांनी सुहाना खान हिला विकण्यासाठी साठे खरेदीखत केले आहे. ही जागा वर्ग-२ची असल्यामुळे तिची खरेदी-विक्री ही जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने करावी लागती. मात्र खोटे कुटुंबाने तशी कोणतीच परवानगी न घेता अटी-शर्तीचा भंग केल्याचे तहसीलदारांनी अहवालात नमूद केले आहे.

थळ येथील येथील सर्व्हे नंबर ३४५/२ ही जमीन लागवड आणि वापरासाठी १९६८ साली नारायण खोटे यांना शासनाकडून देण्यात आली होती. जमीन देताना ही जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेताच खोटे कुटुंबाने केला साठे करार जमीन जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय गहाण, विक्री अथवा इतरांच्या नावावर करता येणार नाही अशी अट घालण्यात आली होती. मात्र नारायण खोटे यांच्या वारसांनी ही जमीन जिल्हाधिकारी यांची परवानगी न घेताच परस्पर अभिनेत्री सुहाना खान हिला नोंदणीकृत साठे कराराद्वारे विकल्याचे समोर आले आहे. या विक्री व्यवहारावर अलिबागमधील अॅण्ड विवेक ठाकूर यांनी आक्षेप घेतला आहे. खोटे यांच्या वारसांनी ही जमिनी वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात यापूर्वी अर्ज केला होता. मात्र जिल्हाधिकारी यांनी त्यावर निर्णय दिलेला नाही. याप्रकरणी वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी अलिबागच्या तहसील दारांना दिले होते.

प्रत्यक्ष जागेची पाहणी
अलिबाग तहसीलदार यांनी गाव अभिलेखाची पडताळणी केली असता नारायण खोटे यांना सदर जमीन लागवडीसाठी प्रदान केल्याचे दिसून आले. मात्र जमिनीची प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यावर घर, वॉचमन रूम, स्विमिंग पूल अशी बांधकामे आढळून आली. ही बांधकामे अंदाजे ३५ वर्षांपूर्वीची असल्याचे तहसीलदार यांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मूळ शेतीसाठी दिलेल्या जमिनीवर अशी बांधकामे असल्याने ‘शर्तभंग’ झाला असल्याचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे.