YouTuber सवुक्कू शंकर याला गांजा प्रकरणात गुंडा कायद्यांतर्गत अटक

लोकप्रिय युट्यूबर सवुक्कू शंकर याला मे महिन्यात 500 ग्रॅम गांजा बाळगल्याप्रकरणी गुंडा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली मात्र जुलैमध्ये मदुराई न्यायालयाने जुलैमध्ये जामीन मंजूर केला होता.आता पुन्हा सवुक्कू शंकर याला गांजा बाळगल्याप्रकरणी थेनीचे जिल्हाधिकारी आर.व्ही.शजीवना यांनी गुंडा कायद्याअंतर्गत ताब्यात घेतले आहे. सवुक्कू सोबत महेंद्रनला देखील अटक करत त्याच्या घरून 3 किलो गांजा जप्त केला आहे.

29 जुलै रोजी मदुराई कोर्टाने शंकरला गांजा प्रकरणात जामीन मंजूर केला होता, परंतु मद्रास उच्च न्यायालयाने बनावट आणि फसवणूक प्रकरणी नजरकैद रद्द करण्यात आली होती, मात्र पुन्हा काही दिवसांनी गुंडा कायद्याअंतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे.यापूर्वी कोईम्बतूर येथे सवुक्कू शंकरला मे महिन्यात महिला पोलिस कर्मचाऱ्यांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.