40 वर्षांची सुवासिक परंपरा; बाप्पाच्या दरबारात नैसर्गिक अगरबत्तीचा दरवळ

गणपती बाप्पांचे आगमन अगदी दारावर येऊन ठेपलेय. बाप्पांच्या मखराची आरास, लायटिंग आणि इतर साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी होऊ लागली आहे. बाप्पाचा दरबार सजला की त्यात सुवासिक अगरबत्तीचा दरवळ हवा असतो. मनाला प्रसन्न आणि मंत्रमुग्ध करणारा हा दरवळ नैसर्गिक असेल तर… चायनीज अगरबत्तीच्या जमान्यात अशा नैसर्गिक अगरबत्तीची सुवासिक परंपरा तब्बल 40 ते 45 वर्षे जपली आहे दादरच्या महाराजा अगरबत्तीने.

केसरीया चंदन या अगरबत्तीला सध्या बाजारात प्रचंड मागणी आहे. या अगरबत्तीचा सुवास मनाला प्रचंड भुरळ घालणारा आहे. बाजारात केमिकल वापरलेल्या अगरबत्त्या उपलब्ध आहेत. या 100 रुपये किलोने विकल्या जातात. परंतु त्याचा सुगंध त्यात केमिकल असल्यामुळे शरीरासाठी हानीकारक असतो. याउलट महाराजा अगरबत्तीमध्ये नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात आलेला आहे. या अगरबत्तीचा धूर प्रचंड नसतो, सुवास अधिक आणि नैसर्गिक तसेच शरीराला हानीकारक नसतो अशी माहिती महाराजा अगरबत्तीचे मालक श्रेयस अरविंद शहा यांनी दिली. ही अगरबत्ती पूर्णपणे जळते, मध्येच विझत नाही, असे ते म्हणाले. जितकी सुवासिक आणि उग्र अगरबत्ती स्वस्त तितके त्यात केमिकल अधिक प्रमाणात वापरलेले असते. त्यामुळे उत्तम दर्जाच्या अगरबत्त्या घ्या, असे त्यांनी सांगितले. या अगरबत्त्या 30 ते 40 मिनिटे जळतात. मात्र त्याचा सुवास पुढचे 2 ते अडीच तास राहतो. महाराजा अगरबत्ती, रघुनाथ निवास, डी.व्ही. देशपांडे मार्ग, शिवाजी पार्क, दादर येथे या नैसर्गिक अगरबत्ती उपलब्ध आहेत.

  • स्वामी समर्थांच्या मठात केवडय़ाचा सुवास येतो. त्या सुगंधावर आधारीत स्वामी ही अगरबत्ती महाराजाने बाजारात आणली आहे. याशिवाय केसरीया उद आणि केसरीया चंदन या अगरबत्तीही उपलब्ध आहेत. या सर्व अगरबत्ती 1200 रुपये किलोच्या दराने उपलब्ध आहेत.
  • मिस्टीक मस्क म्हणजेच कस्तुरी, प्रार्थना, आयुर्वेदिक संकल्पनेवर आधारित रुद्राक्ष या अगरबत्त्या 1000 रुपये किलो दराने उपलब्ध आहेत.
  • ग्रीन मस्क, उद, अॅक्वा या अगरबत्ती 800 रुपये किलो या दराने उपलब्ध आहेत.
  • लिची, सागर, अजारू, व्हॅनिला या अगरबत्ती 600 रुपये किलो या दराने उपलब्ध आहेत.