पत्ता सांगितला नाही म्हणून शेतकऱ्याचा खून केला, त्र्यंबकेश्वरजवळ घडला धक्कादायक प्रकार

1031
murder-knife

नाशिक ग्रामीण पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. या चौघांनी एका शेतकऱ्याचा खून केल्याचे उघड झाले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धोंडेगाव इथे हा गुन्हा घडला होता. 11 मे रोजी शेतकऱ्याचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला होता. त्याच्या हत्ये प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात आयपीसीच्या कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. या चौघांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हत्येमागचं कारण जेव्हा पोलिसांनी आरोपींकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना कळालं की अत्यंत शुल्लक कारणावरून त्यांनी या शेतकऱ्याचा खून केला. जे आरोपी आहेत त्यातील एकजण हा सावकार आहे. एका व्यक्तीकडून पैसे वसूल करण्यासाठी ते आले होते. आरोपींनी शेतकऱ्याला ज्याच्याकडून पैसे वसूल करायचे होते त्याचा पत्ता विचारला. शेतकऱ्याने तो सांगितला नाही. याचा राग आल्याने चारही आरोपींनी शेतकऱ्याचा खून केला. संजीवनी हार्ट केअर अँड रिसर्च सेंटरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दृश्यांमुळे आरोपींपर्यंत पोहोचणे सोपे झाले. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या