विज्ञानाधारीत अंदाज चुकले, पावसासाठी आता देवाला साकडे

84

सामना ऑनलाईन, चंद्रपूर

देशातील हवामान खात्याने पावसाबद्दल यावर्षी वर्तवलेले बहुतांश अंदाज चुकलेले आहेत. विज्ञानाच्या आधारे वर्तवण्यात आलेले हे अंदाज चुकीचे ठरल्याने आता शेतकऱ्यांनी देवाची प्रार्थना करायला सुरूवात केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गोंडपिंपरी तालुक्यात धाबा या गावामध्ये शेतकऱ्यांनी पाऊस पाडगा देवा…! अशी हाक मारत देवाला पाऊस पडावा यासाठी विनंती केली.

धाबा येथील गावक-यांनी लोकवर्गणी गोळा करुन भिवसन देवाला साकडं घातलं. गावातील महिलांनी डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली. गावाच्या वेशीवर एका पाराखाली असलेल्या देवाची पारंपरिक पूजा करण्यात आली.

चंद्रपूर जिल्ह्यात दीड महिना लोटला तरी पावसाचा पत्ता नाही. यंदाही पावसाअभावी पीक हातून जाण्याची भीती शेतकऱ्याला वाटत आहे. यावर्षी पावसाळ्यात चांगला पाऊस होईल असं भाकित हवामान खात्याने वर्तवलं होतं. यामुळं मोठ्या उत्साहानं शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. मात्र पावसानं दगा दिल्याने शेतातील कोवळी पिके करपू लागली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या