अंतरवाली सराटी येथील तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सामना प्रतिनिधी । वडीगोद्री

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील तरुण शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीमुळे व कर्जबाजारीपणामुळे चिंचाच्या झाडाला गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज १५ मे रोजी पहाटे घडली.

अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील शेतकरी प्रल्हाद पाराजीराव तारख (४०) यांची दोन एकर शेती आहे. परंतु दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतीवरचे कर्ज फिटनासे झाल्यामुळे १५ मे रोजी पहाटे गावालगत एका चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्याकडे राष्ट्रीयकृत बँक व विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज आहे. घटनास्थळी जमादार भास्कर आहेर व सय्यद यांनी पंचनामा केला.