गंगाखेड तालुक्यातील वझुर येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

19

सामना प्रतिनिधी । गंगाखेड

गंगाखेड तालुक्यातील वझुर येथील एका तरुण शेतकऱ्यांने सततच्या नापिकी व बँकेच्या कर्जाला कंटाळून सकाळी ६:३० च्या दरम्यान शेतातील आखाड्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पूर्णा तालुक्यातील वझुर येथील दत्ता बाबुराव पवार (२३) यांनी शेतीतील बँकेचे कर्ज घेतले होते. ते कसे फेडावे या विचारात ते नेहमी असताचे याच विवंचनेतू त्यांनी आज सकाळी ६.३० च्या सुमारास शेतातील लोखंडी शेडच्या आडूस गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मारोती माणिकराव पवार यांच्या खबरी वरून गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंदारे करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या