कारेवाडी येथे तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

652

शिरुर अनंतपाळ तालुक्यातील या महिन्यातील दुसरी शेतकऱ्याच्या आत्महत्याची घटना असून तालुक्यातील कारेवाडी येथील दगडू एकनाथ घोलपे (वय ४४) या अल्पभूधारक शेतकऱ्याने सततच्या नापिकीला व दुष्काळाला, कर्जाला कंटाळून स्वतःच्या शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ च्या दरम्यान आत्महत्या केल्याची घटना घडली.

शिरुर अनंतपाळ पोलिसाकडून मिळालेल्या माहितीवरुन तालुक्यातील कारेवाडी येथील दगडू एकनाथ घोलपे (वय ४४) या तरुण अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून स्वतःच्या शेतातील बोरीच्या झाडाला १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. कोंडीबा एकनाथ घोलपे यांच्या खबरीवरून शिरुर अनंतपाळ पोलिसात आकस्मीत मृत्युचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी सतीश सारोळे करीत आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या