
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा चेहरा मॉर्फ करून अश्लील एआय व्हिडीओ तयार केल्याप्रकरणी हरयाणा पोलिसांनी पिता-पुत्राला अटक केली आहे. दोघांना बिहारमधील गोपाळगंज येथून ताब्यात घेण्यात आले. न्यायालयात हजर केल्यानतंर त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मोहिबुल हक आणि गुलाब जलान अशी या दोघांची नावे आहेत. दोघेही बऱ्याच काळापासून रियल पॉईंट नावाचे यूट्यूब चॅनेल चालवत आहेत. त्यांच्या चॅनेलवर एआयच्या मदतीने अनेक व्हिडीओ अपलोड करण्यात आले असून त्यांनी अनेकांची त्या माध्यमातून फसवणूक केल्याचे समोर आले आहे.