लोणावळ्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई, 10 नामांकित रिसॉर्टवर छापे

सामना ऑनलाईन । लोणावळा

पर्यटननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळा शहरातील नामांकित 10 हॉटेल्सवर शनिवारी अन्न व औषध प्रशासनाकडून छापे टाकण्यात आले. यावेळी बहुतांश ठिकाणी मुदतबाह्य पदार्थ वापरून तयार केलेल्या खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचे आढळून आले असून स्वच्छतेचे प्राथमिक निकष देखील येथे पाळले गेले नसल्याचे समोर आले आहे. .

अन्न व औषध प्रशासनाने लोणावल्यातल्या तुंर्गाली, कुनेणामा, वळवण आणि वाकसाई नाका परिसरातील 10 हॉटेल्स आणि रिसॉर्टवर कारवाई केली आहे. या ठिकाणी अतिशय गलिच्छ जागेत अन्न पदार्थ बनवले जात असल्याचे समोर आले असून स्वच्छतेचे प्राथमिक निकष देखील येथे पाळले गेले नसल्याचे आढळून आले आहे. मुदतबाह्य डाळी, पिठे, ब्रेड, चिकन, फिश फिंगर, मसाले, सडक्या भाज्या, शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थाची एकाच फ्रीजमध्ये केलेली साठवणूक या गोष्टी तपासणीत आढळून आल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांहितले. तसेच अतिशय गलिच्छ ठिकाणी अन्न पदार्थ बनवले जात असल्याचे समोर आले असून स्वच्छतेचे प्राथमिक निकष देखील येथे पाळले गेले नसल्याचे आढळून आले आहे. तसेच कायद्याने आइस्क्रीमसाठी नायट्रोजनचा वापरण्यास बंदी असताना येथे राजरोसपणे नायट्रोजनचा वापर होत असल्याचे उघड झाले आहे.

कारवाई झालेल्या हॉटेल्सची नावं- 
1) लगुणा रिसॉर्ट,तुर्गाली लोणावळा
2) आबेटेल ग्रँड रिसॉर्ट,तुर्गाली लोणावळा
3) डेला ऍडव्हेंचर अँड रिसोर्ट ,कुनेणामा लोणावळा
4) स्टर्लिंग हॉलिडे रिसॉर्ट, वळवण लोणावळा
5) हॉटेल कैलास पर्वत, वळवण लोणावळा
6) रिदम हॉटेल, तुर्गाली लोणावळा
7) किनारा व्हिलेज ,वाकसाई नाका लोणावळा
8) ग्रीन लैण्ड डेलसोल रिसॉर्ट ,लोणावळा
9) कुमार रिसॉर्ट, लोणावळा
10) जे.जे. हॉटेल्स अँड रिसॉर्ट,वळणन लोणावळा

आपली प्रतिक्रिया द्या