
नागपाड्यात गुरुवारी रात्री दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारीची घटना घडली. लोखंडी रॉड, कोयते, बांबू घेऊन दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले. यात सहा ते आठ जण जखमी झाले असून त्यातील एक जण गंभीर जखमी असल्याचे समजते. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून 13 जणांना ताब्यात घेतल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येते.
नागपाड्याच्या कामाठीपुरा परिसरात आर्थिक कारणावरून दोन गटात वाद झाला. बाचाबाचीचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले आणि काही कळायच्या आत दोन्ही बाजूकडील तरुण एकमेकांवर तुटून पडले. लोखंडी रॉड, कोयते, बांबू घेऊन एकमेकांना मारहाण केल्याने त्यात सहा ते आठ जण जखमी झाले. त्यांना तत्काळ नजीकच्या इस्पितळात नेण्यात आले. त्यापैकी एका प्रपृती गंभीर असल्याचे कळते. रात्रीच्या वेळेस तुफान राडा झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते.
























































