
हिंदुस्थानात सध्याच्या घडीला बहुतांश राज्यामध्ये उन्हाचा कहर दिसून येत आहे. देशात उष्णतेची लाट असताना, आइस्क्रीमची विक्रीही मोठ्या प्रमाणावर सुरुवात होते. त्यामुळेच उन्हाळा आल्यावर विविध फ्लेवर्सची आइस्क्रीम बाजारामध्ये आपल्याला दिसू लागतात. खास उन्हाळा नजरेसमोर ठेवून आइस्क्रीम कंपन्या नानाविध रंग आणि फ्लेवर्सचे आइस्क्रीम बाजारात घेऊन येत आहेत.
सध्याच्या घडीला आइसक्रीमची आवड मोठ्या प्रमाणात वाढत असून, मंगळुरू या शहराला हिंदुस्थानचे आइस्क्रीम कॅपिटल म्हणून ओळखले जाते. मंगळुरुमध्ये आइसक्रीमची परंपरा अनेक दशकांपासून आहे. येथे जुन्या, पारंपरिक आइसक्रीम पार्लरपासून ते आधुनिक आणि प्रीमियम ब्रँड्सपर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत. स्थानिक लोकांमध्ये आइसक्रीम खाण्याची सवय दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहे. या शहरात वेगवेगळ्या चवींचे, नवीन प्रयोगांचे आणि फ्युजन प्रकारचे आइसक्रीम मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळेच पर्यटकांनाही चेन्नईतील आइसक्रीम संस्कृतीचा अनुभव घेण्याची उत्सुकता असते.
मंगळुरू हे आइस्क्रीमचे शहर म्हणून एका रात्रीत उदयास आले नाही. तर गेल्या कित्येक वर्षांपासून मंगळुरु हे शहर खास आइस्क्रीमसाठी प्रसिद्ध झाले आहे. आईस्क्रीम हे जवळजवळ एक शतकापासून मंगळुरूच्या खाद्यसंस्कृतीचा भाग बनलेले आहे. मंगळुरुचे आइस्क्रीम हे ट्रेड सेटिंगमध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावतात. २० व्या शतकाच्या सुरुवातीला, वसाहतकालीन खाद्य सवयींच्या प्रभावामुळे आईस्क्रीम मंगळुरूमध्ये आले. पण स्थानिकांनी ते किती लवकर स्वीकारले आणि त्यात बदल घडवले, हीच या शहराची खासियत होती. तिथल्या स्थानिक आइस्क्रीमची ओळख ही जगभरातील ट्रेंडसवर आधारीत ठरते. त्यामुळेच इथल्या आइस्क्रीममध्ये एक वेगळेपणा जाणवतो. मुख्य म्हणजे मंगळुरुच्या स्थानिक ब्रँड्सनी अनेक वर्षे आपले वर्चस्व टिकवून ठेवले असून, त्यांनी ग्राहकांच्या आवडीनुसार सातत्याने नवे प्रकार सादर केले आहेत.



























































