
आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्याचे संरक्षण करण्यासाठी काही मास्क हे खूप गरजेचे आहेत. चेहरा सुंदर दिसण्यासाठी, आपण अनेक घरगुती उपायदेखील करु शकतो. खासकरुन चेहऱ्यासाठी लावण्यात येणारे मास्क हे आपण घरच्या घरी अगदी कमी खर्चात करु शकतो. चेहऱ्याला हायड्रेट ठेवण्यासाठी, हिवाळ्यात काही मास्क हे लावणे खूप गरजेचे आहेत.
त्वचेवर ग्लो यावा म्हणून आहारात हे पदार्थ समाविष्ट करायला हवेत, वाचा
१ टेबलस्पून मध आणि दही समान प्रमाणात मिसळा आणि स्वच्छ चेहऱ्यावर लावा. ते १०-१५ मिनिटे तसेच राहू द्या आणि कोमट पाण्याने धुवा. यामुळे ओलावा टिकून राहतो.
अर्धा एवोकॅडो (पिकलेला) आणि समान प्रमाणात पिकलेले केळे मॅश करा. त्यामध्ये १ टेबलस्पून मध घाला आणि गुळगुळीत पेस्ट तयार झाल्यावर चेहऱ्यावर लावावे. १५-२० मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
केळी मॅश करावी आणि त्यात दूध आणि मध मिसळावे. ४० मिनिटे चेहऱ्यावर राहू द्यावे त्यानंतर चेहरा धुवावा.
केळी मॅश करा आणि त्यात दह्याचा समावेश करून पेस्ट बनवा आणि १५ मिनिटे चेहऱ्यावर लावा.
फक्त एवोकॅडो मॅश करून मास्क देखील बनवू शकता. १५-२० मिनिटे तसेच राहू द्या.
१ टेबलस्पून मध आणि २ टेबलस्पून ओट्स मिसळा. हा हायड्रेटिंग मास्क १५-२० मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर चेहरा धुवावा.
बदाम तेल आणि मधाचे काही थेंब कोरफडीचे जेल मिसळा आणि लावा. २० मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर धुवा.
हिवाळ्यात पेट्रोलियम जेलीचा नियमित वापर केल्याने, चेहऱ्यावरीलच नाही तर हातापायांवरील कोरडी त्वचा दूर होण्यास मदत होते.
टोमॅटोचा रस, १ चमचा लिंबाचा रस आणि १ टेबलस्पून दही मिसळून पेस्ट बनवा. ते तुमच्या चेहऱ्याला लावा आणि १५-२० मिनिटांनी धुवावे.
पपईच्या लगद्यामध्ये थोडे मध मिसळून मास्क बनवा. हा मास्क १५-२० मिनिटे तसेच राहू द्या, नंतर चेहरा धुवावा.
पिकलेली पपई मॅश करावी, त्या लगद्यामध्ये १ चमचा ऑलिव्ह ऑइल घाला आणि १५-२० मिनिटे तसेच लावा. कोमट पाण्याने चेहरा धुवा.


























































