
नांदेडमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील कॅनल रोडवरील रेड ओक स्पा सेंटरवर छापा टाकत पोलिसांनी देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. सदर स्पा सेंटर मिंधे गटाचा नांदेडमधील पदाधिकारी अमोद साबळे याच्या मालकीचा आहे. याप्रकरणी पाच जणांविरोधात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर साबळे फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून दोनजण फरार आहेत. नागसेन गायकवाड, संतोष इंगळे, रोहन गायकवाड अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर स्पा सेंटरचा मालक आणि मिंधे गटाचा पदाधिकारी अमोद साबळे आणि मॅनेजर मनोज जांगिड हे दोघे फरार आहेत. पोलिसांनी स्पा सेंटरमधून चार महिलांची सुटका केली असून 16 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस फरार आरोपींना शोध घेत आहेत.