
इलेक्ट्रिक पॅनलमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची घटना भंडाऱ्यात घडली. जिल्हाधिकारी कार्यालयात आगीची घटना घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. केवळ इलेक्ट्रिक वायर जळाल्या. अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
अचानक इलेक्ट्रिक पॅनेलमधून धूर निघू लागला. पाहता पाहता धूर सर्व कक्षांमध्ये पसरला. सुरक्षा रक्षकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तात्काळ महावितरणचे वीज कर्मचारी आणि अग्नीशमन दलाला माहिती दिली. अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. यामुळे पुढील अनर्थ टळला.