
संसद भवनापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंट्सला शनिवारी भीषण आग लागली. डॉ. बिशंबर दास मार्गावर असलेल्या ब्रह्मपुत्र आपार्टमेंट्समध्ये लोकसभा आणि राज्यसभेतील अनेक खासदारांची निवासस्थाने आहेत. या दुर्घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असली तरी सुदैवान जीवितहानी झाली नाही. दरम्यान, आगीची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या टीमने घटनास्थळी धाव घेत मदत आग आटोक्यात आणली.