मुंबई विमानतळाच्या टर्मिनल वनला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल १-बी मध्ये गुरुवारी आग लागल्याची घटना समोर आली आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही आग टर्मिनलच्या तळमजल्यावर असलेल्या केबल ट्रे आणि स्विच बॉक्समध्ये लागल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि वॉर्ड कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) अधिकाऱ्यांनी ‘हिंदुस्थान टाइम्स’शी बोलताना सांगितले की, आग लागल्यानंतर सुरुवातीला विमानतळावरील अग्निशमन बंबांच्या साहाय्याने ती विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आगीचे स्वरूप पाहता मुंबई अग्निशमन दलाची अतिरिक्त मदत मागवण्यात आली आहे. सध्या आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असून, ती केवळ तळमजल्यापर्यंतच मर्यादित असल्याचे सांगण्यात आले आहे.