
मुंबईतील सायन रुग्णालयाच्या ऑर्थोपेडिक ओपीडीमध्ये भीषण आग लागली. आग लागल्यानंतर, रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून कोणीही जखमी झाले नाही. एसीमध्ये स्फोट झाल्याने, ही आग लागल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी दिली आहे.
मुंबईतील सायन रुग्णालयात आग; एसीमध्ये स्फोट झाल्याने उडाला भडका, रुग्णांसह नातेवाईकांमध्ये घबराट#SionHospital #Sion #Mumbai #FireIncident pic.twitter.com/a1vigacW3k
— Saamana Online (@SaamanaOnline) March 31, 2026
आग लागल्याचे समजताच, कर्मचाऱ्यांना तात्काळ रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते, ज्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते.


































































