कोरोनाच्या माहामारीनंतर आता बर्ड फ्लूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. जगातील अनेक देशांमध्ये बर्ड फ्लूचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. दरम्यान या विषाणूमुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मेक्सिकोमध्ये 59 वर्षीय रुग्णाचा बर्ड फ्लूने मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला H5N2 नावाच्या बर्ड फ्लूची लागण झाली होती. या व्यक्तीला आधीपासूनच अनेक आजार होते. मात्र त्याच्या मृत्यूचे कारण बर्ड फ्लू असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या व्यक्तीला 23 मे रोजी बर्ड फ्लू या संसर्गाची लागण झाली होती. या नंतर 59 वर्षीय त्या रूग्णाला मेक्सिको सिटीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ताप आणि श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने त्या व्यक्तीला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराजरम्यानच त्याचा मृत्यू झाला. हा आजार प्राण्यांपासून पसरला होता की माणसातून हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. H5N2 या आजारामुळे मानवी मृत्यूची ही पहिलीच घटना असल्याची WHO ने नोंद केली आहे.
बर्ड फ्लूच्या वाढत्या रुग्णांमुळे हिंदुस्थानच्या सरकारकडून बर्ड फ्लूबाबत अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. बर्ड फ्लू हा कोरोनापेक्षा कितीतरी पटीने जास्त धोकादायक आहे. यामुळे मृत्यूचे प्रमाणही तितकेच जास्त आहे. अशा परिस्थितीत सावध राहण्याची गरज आहे. दरम्यान सर्व राज्यांना पक्षी आणि कोंबड्यांच्या मृत्यूवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला होता. पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्यांनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले.
एपिडेमियोलॉजिस्ट डॉ.अजय कुमार यांनी सांगितले की, बर्ड फ्लूची मानवाला लागण होणे खूप अवघड आहे, परंतु मेक्सिकोमधील एका व्यक्तीचा मृत्यू हे चिंतेचे कारण आहे. गेल्या काही वर्षांपासून जगभरात या विषाणूची प्रकरणे वाढत आहेत. पक्ष्यांव्यतिरिक्त हा विषाणू आता गायी आणि इतर काही प्राण्यांमध्येही पसरत आहे. आता मानवी संसर्गाचे प्रकरण समोर आले आहे. जे धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत, लोकांना या विषाणूची लक्षणे आणि प्रतिबंध याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
बर्ड फ्लूची लक्षणे काय आहेत-
– उच्च ताप
– डोकेदुखी
– स्नायू दुखणे
– श्वसनविषयी दाह, फुफ्फुसातील दाह
– थरथर कापणे