
गारेगार आरामदायी प्रवास, सीसीटीव्ही, घरबसल्या बुकिंग, हवी तिथे थांबणार देशातील पहिली इलेक्ट्रिक बस सेवा
मुंबईकरांसाठी ‘बेस्ट’मध्ये एसी इलेक्ट्रिक आरामदायी लक्झरी बस दाखल झाल्या असून त्या सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहेत. देशातील ही पहिलीच इलेक्ट्रिक बस सेवा ठरणार असून ठाणे ते बीकेसी या मार्गावर ही सेवा असेल. ‘चलो बेस्ट बस’ अशी या बसेसची ओळख राहणार आहे. या बसचे तिकीट ऑनलाईन काढता येणार आहे. तुम्ही ज्या ठिकाणाहून तिकीट बुपिंग कराल तिथून प्रवास करता येणार आहे. वांद्रे स्थानक ते बीकेसी दरम्यान तिकीट दर 50 रुपये असून ठाणे ते बीकेसी दरम्यान 205 रुपये प्रवास भाडे आहे. ‘बेस्ट’कडून प्रदूषणमुक्त आणि गारेगार प्रवासासाठी इलेक्ट्रिक एसी बस आणल्या जात आहेत. तर आता ‘बेस्ट’च्या ताफ्यात चार प्रिमियम बस दाखल झाल्या आहेत. लवकरच 200 प्रिमियम बसेस दाखल होणार आहेत.
अशी असणार बस सेवा
ठाणे येथून सकाळी 7, 7.30, 8 व 8.30 वाजता ही बस सुटणार असून बीकेसी येथून संध्याकाळी 5.30, 6, 6.30 व 7 वाजता सुटणार आहे.
z तर बीकेसी येथून सकाळी 8.50 व संध्याकाळी 5.39 वाजता बस सुटणार आहे. तर वांद्रे स्थानक पूर्व येथून सकाळी 9.25 वाजता व संध्याकाळी 6.25 वाजता बस सुटणार आहे.
प्रिमियम लक्झरी बसमध्ये सुरक्षेसाठी सीसीटीव्ही पॅमेरे, पुश बॅक सीट, सीटसमोर लॅपटॉप ठेवण्यासाठी जागा, वातानुकूलित, यूएसबी चार्जर सुविधा आहे.



























































