क्रॉस व्होटिंग भोवणार, हरयाणातील पाच काँग्रेस आमदारांचे होणार निलंबन; चौकशी समितीचा अहवाल सादर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या पाच आमदारांना निलंबित करण्यात येणार आहे. प्रदेश काँग्रेसच्या शिस्तभंग समितीने यासंदर्भातील अहवाल हरयाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राव नरेंद्र सिंह यांना सोपवला आहे. या पाचही आमदारांना निलंबित करुन त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची शिफारस समितीने केली आहे. शैली चौधरी, रेणू बाला, मोहम्मद इलियास, मोहम्मद इस्राईल आणि जरनैल सिंग या आमदारांवर क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप होता.

क्रॉस व्होटिंगमुळे हरयाणात काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. त्यामुळे या आमदारांविरोधात कठोर कारवाईची मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली होती. आता समितीचा अहवाल हायकमांडकडे पाठवण्यात येईल. हायकमांडतर्फे त्यांच्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. रेणू बाला आणि शैली चौधरी यांनी काँग्रेस उमेदवारालाच मतदान केल्याचा दावा चौकशी समितीसमोर केला. मात्र, समितीने तो फेटाळला.