
आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या कारने मागून ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. हे कुटुंब बंगळुरूहून तिरुमाला मंदिराच्या दर्शनासाठी जात होते. हा अपघात बंगळुरू-चेन्नई राष्ट्रीय राजमार्गावर झाला आहे. गंगावरम मंडळाच्या डुडापल्ली चौफुलीजवळ एका भरधाव कारने मागून ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला. मोहन दास, नागराज राव, कुसुमा, जयंती आणि पूजा अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण भगवान वेंकटेश्वराच्या दर्शनासाठी तिरुमालाकडे जात होते.





























































