Breaking News – छत्तीसगडमध्ये 5 नक्षलवाद्यांना कंठस्नान

360

छत्तीसगडमधील नारायणपूर भागामध्ये सुरक्षा दलाची नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली असून यामध्ये आतापर्यंत 5 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. अबूजमाडच्या जंगलात ही चकमक झाली असून या चकमकीमध्ये 2 जवानही जखमी झाली आहे.

या चकमकीमध्ये आणखीही नक्षलवादी मारले गेल्याची शक्यता आहे तसेच काही नक्षलवादी गंभीररित्या जखमीही झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बस्तरचे पोलीस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा यांनी या चकमकीत 5 नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त खरे असल्याचं सांगितलं आहे.

अबूजमाडच्या जंगलामध्ये ओरछा-गुमरका भागात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. इते नक्षलवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, त्यामुळे जवानांनी या नक्षलवाद्यांना या भागात घेरण्याचं ठरवलं होतं. ओरछा इथे हे जवान परिसराची टेहळणी करत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार करायला सुरुवात केली आणि इथूनच या चकमकीला सुरुवात झाली. ही चकमक जवळपास 1 तास सुरू होती.

आपली प्रतिक्रिया द्या