
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे हल्ले वाढले असून सलग तिसऱ्या दिवशी मूल तालुक्यातील भादुर्णी येथे जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या भूमिका भेंडारे (30) या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली. तीन दिवसांत वाघाने घेतलेला हा पाचवा बळी आहे. दरम्यान, या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जंगलाला आग लावण्याचा प्रयत्न केला.
चंद्रपूरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून वाघाचे हल्ले वाढले असून सिंदेवाही व मूल या दोन तालुक्यात पाच महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी ग्रामीण भागातील महिला जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी जातात.