‘आयपीएल’ सामन्यांसाठी आता पाच पंच,सौरव गांगुली यांचा क्रांतिकारी निर्णय

889

मागील आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत नो बॉलमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपरकिंग्ज या संघांना हार पत्करावी लागली होती. या चुकीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून BCCI चे अध्यक्ष सौरभ गांगुली Saurav Ganguly यांनी आगामी ‘आयपीएल’ सामन्यांसाठी पाच पंच नेमण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला.

मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या ‘बीसीसीआय’च्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीत नो बॉलच्या मुद्दय़ावर गंभीरपणे चर्चा झाली. त्यावरून फ्रंट फूटवरील नो बॉल पाहण्याची जबाबदारी तिसऱ्या पंचांवर असेल असे ठरले. याचबरोबर आगामी ‘आयपीएल’मध्ये फक्त नो बॉल लक्ष ठेवण्यासाठी आणखी एक पंच नेमण्यात येणार आहे.

हिंदुस्थान-बांगलादेशदरम्यान झालेल्या दिवस-रात्र कसोटीत नो बॉलवर लक्ष ठेवण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर एक पंच नेमण्यात आला होता. सौरभ गांगुली यांचा हा प्रयोगही यशस्वी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळेच आगामी ‘आयपीएल’मध्ये नो बॉलसाठी अतिरिक्त पंच नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ‘आयपीएल’च्या मागील सत्रात मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई व चेन्नई सुपरकिंग्ज या दोन सामन्यांत पंचांच्या चुकीचा फटका बसला होता. दोन्ही लढतींत पंचांनी फ्रंटफूट नो बॉल दिला नाही. त्यामुळे बंगळुरू व चेन्नई या संघांना हार पत्करावी लागली होती.

आपली प्रतिक्रिया द्या