वेळः सकाळी 8 वा.
देशाच्या स्वातंत्र्यदिनी उद्या दादर येथील शिवसेना भवनाच्या प्रांगणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे. त्याप्रसंगी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेसुद्धा उपस्थित राहणार आहेत.
15 ऑगस्ट 1947 रोजी हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिशांच्या जोखडातून भारतमातेला मुक्त करण्यासाठी असंख्य देशभक्तांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यलढय़ात झोकून दिले. देशासाठी प्राणांची आहुती दिली. शिवसेनेनेही देशाभिमान सदैव जपला. 15 ऑगस्टला स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला तिरंगा राष्ट्रध्वज फडकवून देशाप्रति आदर व्यक्त केला जातो. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी दिली जाणार आहे.
ध्वजारोहणाला शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, विभागप्रमुख, पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात करण्यात आले आहे.