तुर्कीच्या नव्या तंत्रज्ञानाने साऱ्यांना चक्रावून सोडलंय. तुर्कीमध्ये उडणारी कारची (फ्लाइंग कार) निर्मिती सुरू झालीय. फ्लाइंग कार रस्त्यावर धावतानाच हवेत उडण्यास सक्षम असेल. स्पेशल टेक्नोलॉजी आणि इंजिनीयरिंगच्या मदतीने कार तयार करण्यात येतेय. ही फ्लाइंग कार 2025 मध्ये उडेल. एअरकार या कंपनीने फ्लाइंग कार साकारलीय. शहरांतील वाहतूककोंडी कमी करणे आणि लोकांचा वेळ वाचवणे, हा त्यामागील उद्देश आहे. एअर कार कंपनीतर्फे वर्षअखेरपर्यंत फ्लाइंग कारची विक्रीपूर्ण नोंदणी सुरू करेल. फ्लाइंग कारची किंमत अंदाजे 1.67 कोटी आहे.