
अॅपल 2026 मध्ये फोल्डेबल आयपह्न आणण्याची तयारी करत आहे. हा फोन आयपॅड मिनीसारखा असेल. फोल्डेबल आयफोनमध्ये दोन डिस्प्ले असतील. बाहेरील कव्हर डिस्प्ले 5.2 इंचांचा असेल, तर फोन उघडल्यावर आतील मुख्य स्क्रीन 7.8 इंचांची असेल. या फोनमध्ये दोन 18 मेगापिक्सलचे फ्रंट फेसिंग कॅमेरे दिले जाऊ शकतात. या फोनची किंमत 2 लाखांच्या वर असू शकते. सॅमसंगने पाच वर्षांपूर्वीच गॅलेक्सी झेड फोल्ड आणि गुगलने पिक्सल फोल्ड फोन लाँच केलेले आहेत.

























































