असं झालं तर… क्रेडिट कार्डचे बिल थकले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर न भरल्यास  लेट पेमेंट फी, थकबाकीवर जास्त व्याज (वार्षिक) आणि क्रेडिट स्कोअरमध्ये मोठी घट होते व यामुळे कार्ड ब्लॉक होऊ शकते.

थकबाकीच्या वसुलीसाठी तुम्हाला कॉल येऊ शकतात आणि थकबाकी 6 महिन्यांपेक्षा जास्त राहिल्यास कायदेशीर कारवाईही होऊ शकते.

क्रेडिट स्कोअरमध्ये मोठी घसरण होते, ज्यामुळे भविष्यात कर्ज/क्रेडिट कार्ड मिळणे कठीण होते. बँक तुमचे कार्ड तात्पुरते किंवा कायमचे ब्लॉक करू शकते.

चक्रवाढ व्याजामुळे बिल प्रचंड वाढू शकते. शक्य असल्यास ‘टोटल डय़ू’ भरा. किमान ‘मिनिमम डय़ू’ भरा, जेणेकरून तुमचा दंड टळू शकतो.

बिल भरण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेणे क्रेडिट कार्डच्या व्याजापेक्षा कमी महाग पडू शकते. बँकेशी संपर्क साधून अतिरिक्त वेळ किंवा सेटलमेंटची विनंती करा.